Headlines

छत्रपती शाहू महाराजांचे २ से.मी. उंचीचे शिल्प साकारून अनोखी मानवंदना

⚡मालवण ता.०५-: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या सांगतानिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून संपूर्ण राज्यात साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर नेहमीच नावीन्यपूर्ण कलाकृती साकारणारे कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे जवळपास दोन सेंटिमीटर उंचीचे शिल्प साकारत शाहू महाराजांना मानवंदना दिली आहे. समीर चांदरकर हे…

Read More

बांदा केंद्र शाळेच्या ‘सोनेरी क्षण’ पुस्तिकेचे प्रकाशन

उपशिक्षक जे.डी.पाटील यांनी केले संकलन ⚡बांदा ता.०५-: उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक मिळविलेल्या जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेतील यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे शाळेतील उपशिक्षक श्री जे.डी.पाटील यांनी संकलन केलेल्या सोनेरी क्षण या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपकभाई केसरकर व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या शाळेच्या उपक्रमांची दखल घेऊन राज्य…

Read More

मसुरे कावा शाळेचे डॉट कॉम असोसिएशन परीक्षेत शंभर टक्के यश

⚡मालवण ता.०५-: डॉट कॉम असोसिएशन या परीक्षेमध्ये जि.प.प्राथमिक शाळा मसुरे कावा शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण १२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यातील ३ विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत आहेत.त्याना सन्मान चिन्ह , प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. नंदिनी अरूण आंबेरकर, रूद्र पंढरीनाथ मसुरकर, प्रांजल अरूण आंबेरकर यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान…

Read More

मालवणात २२५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

⚡मालवण ता.०५-: एप्रिल महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मालवण येथे २२५ वाहनचालकांवर १ लाख ३५ हजार ८०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. मालवण शहरात ट्रीपल सीट वाहन चालविणे, लायसन्स नसणे, नंबर प्लेट नसणे, नो पार्किंग एरियात दुचाकी व चारचाकी लावणे, हेल्मेट नसणे, आरसी बूक, पीयूसी नसणे आदी प्रकरणी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. पोलीस…

Read More

तोंडवळी ब्राह्मणदेव मंदिर वर्धापन दिन ७ रोजी

⚡मालवण ता.०५-: तोंडवळी येथील ब्राह्मणदेव मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ७ मे रोजी तेथील सापळेबाग येथे सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. यानिमित्त स्थानिक व मुंबईकर ग्रामस्थ, महिला व मुलांच्या विविध स्पर्धा, वाडीतील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व इतर कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच रात्री १० वा. बुवा संदीप पुजारे (पखवाज-मंजिल काळसेकर, तबला-विनायक मेस्त्री) व बुवा गुंडू…

Read More

रेकोबा विद्यालयाच्या २००३-०४ दहावी बॅचचे स्नेहसंमेलन संपन्न

⚡मालवण ता.०५-: मालवण वायरी भूतनाथ येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाच्या २००३-०४ सालच्या इयत्ता १० वी च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन प्रशालेच्या श्रीमती विजयाताई गावकर सभागृहामध्ये उत्साहात पार पडले. शालेय जीवनानंतर १९ वर्षांनी प्रथमच पुन्हा एकत्र जमलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणीना उजाळा देत त्यात रमून गेले. यावेळी रेकोबा विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास हिंदळेकर यांच्यासह शिक्षक…

Read More

आरोप करणे ही विरोधकांची जबाबदारी ….त्यांनी कर्तव्य पार पाडले…!

विकासकामे केल्यामुळेच विरोधकांना पोटसुळ;समीर नलावडे ,बंडू हर्णे यांचा पलटवार ⚡कणकवली ता.०५-: विरोधी पक्ष म्हणून आरोप करणे ही विरोधकांची जबाबदारी आहे आणि आरोप करून त्यांनी आपले कर्तव्य पार पडले त्यात गांभीर्याने घेण्यासारखे काही नाही अशी खिल्ली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महाविकास आघाडीची उडविली.आता ५ वर्ष झाल्याने सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले आहेत.नगरपंचायतमध्ये एवढे पैसे मिळत…

Read More

सत्ताधाऱ्यांनी कणकवली वासीयांना 5 वर्षात फसविले

सुशांत नाईक ;825 स्क्वेअर फुटाच्या स्वच्छतागृहासाठी तब्बल 86 लाखाचे अंदाजपत्रक हे तर भ्रष्टाचाराचे कूरण ⚡कणकवली ता.०५-: 825 स्क्वेअर फुट स्वच्छतागृहासाठी तब्बल 86 लाखाचे अंदाजपत्रक करत प्रति स्क्वेअर फुट 10,750 रुपयाचा बांधकाम खर्च लावत कणकवली नगरपंचायतीने ठेकेदाराला पोसण्याचे काम करताना मोठा भ्रष्टाचार केला आहे. घराचे बांधकाम करायचे असेल तर 2000 रुपये प्रति स्क्वेअर फुट असा दर…

Read More

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने वेगवेगळ्या पदावर विराजमान झालेल्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार

⚡वेंगुर्ले ता.०५-: भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा तसेच तालुकास्तरीय विविध संस्थांवर नियुक्ती झाल्याबद्दल तालुका कार्यालयात सत्कार करण्यात आला.यामध्ये सिंधुदुर्ग भंडारी पतपेढी – वेंगुर्लेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर तसेेच तालुका चिटणीस सौ.सुजाता देसाई यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार…

Read More

देवगडात जलजीवनची कामे बोगस

शिवसेना तालुकप्रमुखांचा आरोप ;चौकशीची मागणी देवगड ता.०५-: देवगड तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत चालू असेल्या बोगस कामांबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख् विलास साळसकर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे कि, देवगड तालुक्यातील विविध ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत कामाचे…

Read More
You cannot copy content of this page