रामघाट येथील विजेच्या तारेने पहाटे घेतला पेट..

सतर्कतेमुळे अनर्थ टळला..

⚡वेंगुर्ले ता.२७-: वेंगुर्ले रमघाट येथील बबलू आडेलकर यांच्या घरासमोरून ११ के वी विजेच्या तारा जातात. या तारा अचानक पहाटे ४.३० वाजता आग लागून पेटताना दिसल्या. त्यामुळे तत्काळ याची कल्पना बबलू आडेलकर यांनी ग्रां. स. हेमंत गावडे व संजय परब याना दिली.

लगेच त्यांनी वीज वितरण च्या वेंगुर्ले कार्यालयात धाव घेतली आणि तेथील कर्मचाऱ्यांना कळविले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेऊन लगेच तेथील वीजपुरवठा खंडित केला. परिणामी तारेला लागलेली आग आटोक्यात आली आणि होणारे मोठे नुकसान थांबले.

You cannot copy content of this page