भाजी विक्रेत्यांसह बाजारात आलेल्यांना करण्यात आले वाटप
⚡सावंतवाडी ता.२७-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने आज शहरातील भाजीविक्रेते तसेच आठवडा बाजार करणाऱ्यांना 100 छत्र्या व 100 टेंट वाटप करण्यात आले आहेत. हा कार्यक्रम येथील केसरकर यांच्या कार्यालयासमोर करण्यात आला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, महिला शहर प्रमुख भारती मोरे, गजानन आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
