कला शिक्षक सिद्धेश कानसे यांचा माजगाव ग्रामपंचायतच्यावतीने सत्कार

राष्ट्रीय कला पुरस्कार प्राप्त झाल्याने केला सत्कार

⚡सावंतवाडी ता.२७-: कला महर्षी बाबुराव पेंटर आर्ट फाउंडेशन तेरफे आयोजित राष्ट्रीय कला प्रदर्शन व स्पर्धेत निसर्ग विभागात माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयचे कला शिक्षक सिद्धेश सुधाकर कानसे यांनी रेखाटलेल्या निसर्ग चित्राला प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासह राष्ट्रीय कला पुरस्कार प्राप्त झाला. त्याबद्दल माजगांव गावच्या वतीने ग्रामपंचायत माजगांव सभागृहात शिक्षक कानसे यांचा सरपंच डॉ अर्चना सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संजय कानसे, रिचर्ड डिमेलो, विशाखा जाधव, मोर्ये, अशोक धुरी, माधवी भोगण, प्रज्ञा भोगण, गीता कासार , मधु कुंभार , सामाजिक कार्यकर्ते किरण माडखोलकर, शितल भोगण, पुजा गावडे, अजय सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page