वेत्ये सरपंचांच्या दुचाकीवर आढळला साप

नजरेस पडल्याने अनर्थ टळला : घनस सापाला सोडले नैसर्गिक अधिवासात

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या दुचाकीवर आज सकाळी घनस जातीचा साप आढळून आला. श्री. गावडे नेहमी प्रमाणे दुचाकीजवळ असता अचानक घनस निदर्शनास आला. सावधगिरी बाळगत त्यांनी आपला जीव वाचवला. त्यानंतर त्याला वेत्ये येथील सर्पमित्र यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

याबाबतची अधिक माहिती अशी की सरपंच गुणजी गावडे हे आज सकाळी आपल्या दुचाकी घेऊन कामानिमित्त बाहेर पडत असताना त्यांना दुचाकीपाशी घनस असल्याचे समजले. त्यांनी सदर खबर तात्काळ गावातील आपल्या सर्पमित्रांना दिली. मोठ्या शिताफीने घनस सापाला पकडून जंगलमय भागातील नैसर्गिक अधिवासात सोडले.

You cannot copy content of this page