Headlines

पाडलोस मधील ‘तो’ धोकादायक खड्डा अखेर बुजवला

⚡बांदा ता.०९-: पाडलोस मडुरा मार्गावरील सुधीर गावडे यांच्या मांगराच्या विरुद्ध बाजूने रस्त्याला खेटून एका कंपनीने खड्डा खोदून त्यावर झाकण घातलेला धोकादायक खड्डा अखेर प्रशासनाने बुजवला. त्यामुळे पाडलोस ग्रामस्थांसह प्रवासी, वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे. पाडलोस येथील सुधीर गावडे यांच्या मांगराच्या विरुद्ध बाजूला रस्त्याला खेटून एका कंपनीने सखल खड्डा खोदून झाकण टाकले होते. परंतु खड्ड्याची खोली…

Read More

‘माझी माती माझा देश’ अंतर्गत मालवणात घेतली पंचप्रण शपथ

⚡मालवण ता.०९-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत “माझी माती माझा देश” या मोहिमेअंतर्गत दि. ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, शिलाफलकम (स्मारक), वीरोंको वदन, हर घर तिरंगा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मालवण नगरपरिषद देखील “माझी माती माझा देश” या मोहिमेत सहभागी झाली असून नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष…

Read More

नॅब व रोटरी क्लब यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या मदतीसाठी धावून येणार्‍या संस्थांचे कायम ॠणी राहू

अभिमन्यू लोंढेः सावंतवाडी चष्मा वाटपाचा कार्यक्रम संपन्न. ⚡सावंतवाडी ता.०९-: पत्रकार सर्वाच्या मदतीला जातात अनेकांना सहकार्य करतात परंतू त्यांच्या मदतीला कोणीही धावून येत नाही रोटरी क्लब व नॅबच्या माध्यमातून चष्मे देण्यासाठी राबविण्यात आलेला उपक्रम कौतूकास्पद आहे आम्ही पत्रकार त्यांचे कायमचे ऋणी राहू असे मत जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी आज येथे व्यक्त केले. सावंतवाडी तालुका पत्रकार…

Read More

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पुर्ण व्हावे…

सावंतवाडी पत्रकार संघाने खड्ड्यांकडेही वेधले लक्ष  ⚡सावंतवाडी ता.०९-: मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. अपघाताची शक्यता लक्षात घेता, हे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत तसेच रखडलेले चौपदरीकरणाचे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे, अशी मागणी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार संतोष बांदेकर यांच्याकडे सादर केले यावेळी पत्रकारांच्या मुंबई गोवा…

Read More

कुडाळ येथे ‘ऋग्वेद संहिता जपाभिषेका’ची भावपूर्ण वातावरणात सांगता

कीर्तन, प्रवचन, गायन आणि मंत्रजागर यांमुळे भाविक मंत्रमुग्ध ⚡कुडाळ ता.०९-: शहरातील श्री महालक्ष्मी हॉलमध्ये अधिक श्रावण मासानिमित्त ४ ऑगस्ट या दिवशी प्रारंभ झालेल्या ‘ऋग्वेद संहिता जपाभिषेका’ची ८ ऑगस्ट (अधिक श्रावण कृष्ण चतुर्थी ते अष्टमी) यादिवशी विद्वान घनपाठी वैदिक, ब्रह्मवृंद आणि भाविकांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात सांगता झाली.या कालावधीत प्रतिदिन सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत…

Read More

राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत वराड येथील केशव नाचिवणेकर द्वितीय

⚡मालवण ता.०९-: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मालवण तालुक्यातील वराड येथील केशव नाचिवणेकर याने द्वितीय क्रमांक पटकावित नेत्रदीपक यश मिळविले आहे. मुंबई येथे मंत्रालयात आमदार अदिती तटकरे यांच्याहस्ते केशव याला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून साडेचारशे पेक्षा जास्त…

Read More

विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगार महासंघाचे लक्षवेधी आंदोलन

जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन सिंधुदुर्गनगरी ता ९बांधकाम कामगारांना देण्यात येणारे विविध वस्तूरुपी लाभ बंद करून केंद्र सरकारच्या धोरणानुसार लाभाची रक्कम कामगारांच्या बँक खाती जमा करा. या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बांधकाम कामगार महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने हजारो बांधकाम कामगार एकवटून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार संघाचे अध्यक्ष भगवान…

Read More

जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी काढली रॅली

सिंधुदुर्गनगरी ता ९जुनी पेन्शन योजना लागू व्हावी. तसेच बेमुदत संप कालावधीत शासनाने दिलेल्या आस्वासनाची पूर्तता व्हावी या मागणीसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने आज क्रांतीदिनी बाईक रॅली काढून निदर्शने केली. देशभरात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी विविध आंदोलने होत असताना जिल्ह्यामध्ये देखील शासनाच्या कर्मचारीविरोधी धोरणांचा जाहीर निषेध करण्यासाठी तसेच अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी शासनाचे…

Read More

वाहतूक पोलिसावर कारवाईसाठी संदीप मांजरेकर यांचे उपोषण

ओरोस ता.०९-:*वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत असताना लाख लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करून गुन्हा दाखल असलेल्या व हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना सबंधित पोलीस कर्मचाऱ्याला सावंतवाडी पोलीस ठाणे अंतर्गत पुन्हा वाहतूक पोलीस या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. ही नियुक्ती रद्द करण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील संदीप धर्माजी मांजरेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

Read More

आशा कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

ओरोस ता ९“कांद्यात कांदा कुसका कांदा, प्रशासनाला बोचक्यात बांदा”, “लय लय लय अत्याचार, शासन करतेय भ्रष्टाचार” अशा मार्मिक घोषणा देत जिल्ह्यातील आशा कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी मोर्चा काढला. यावेळी आशा कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी पदाचा दर्जा देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. हा मोर्चा अ. भा. जनवादी संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन,…

Read More
You cannot copy content of this page