Headlines

आशा कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

ओरोस ता ९
“कांद्यात कांदा कुसका कांदा, प्रशासनाला बोचक्यात बांदा”, “लय लय लय अत्याचार, शासन करतेय भ्रष्टाचार” अशा मार्मिक घोषणा देत जिल्ह्यातील आशा कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी मोर्चा काढला. यावेळी आशा कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी पदाचा दर्जा देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली.


हा मोर्चा अ. भा. जनवादी संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन, कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आला होता. सिंधुदुर्गनगरीतील ओरोस फाटा येथील शिवाजी पुतळा येथून या मोर्चाला प्रारंभ झाला. शेकडो महिला यात सहभागी झाल्या होत्या. शिवाजी पुतळा येथून निघालेला मोर्चा घोषणांनी दणाणून सोडत जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारा जवळ विसावला. येथे संघटना पदाधिकारी यांनी भाषणे केल्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.

You cannot copy content of this page