मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पुर्ण व्हावे…

सावंतवाडी पत्रकार संघाने खड्ड्यांकडेही वेधले लक्ष 

⚡सावंतवाडी ता.०९-: मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. अपघाताची शक्यता लक्षात घेता, हे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत तसेच रखडलेले चौपदरीकरणाचे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे, अशी मागणी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार संतोष बांदेकर यांच्याकडे सादर केले यावेळी पत्रकारांच्या मुंबई गोवा चौपदरी महामार्ग प्रति भावना वरिष्ठापर्यंत पोचवा अशी विनंती करण्यात आली
     यावेळी तालुका पत्रकार संघाचे सचिव मयुर चराठकर, राज्य पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे,अण्णा केसरकर,डीजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर, नरेंद्र देशपांडे,शैलेश मयेकर,संतोष सावंत,भुवन नाईक,नितेश देसाई,प्रसाद माधव,मंगल नाईक आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की,
मुंबई तून तऴकोकणात येणाऱ्या महामार्गाचे काम कूर्मगतीने सुरू आहे तर या महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरक्ष: चाळण झाली आहे 
मुंबई – गोवा महामार्गावरील जीवघेणे खड्डे तात्काळ भरावेत आणि गेली 12 वर्षे रखडलेले महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे 
 मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2011 मध्ये सुरू झाले.. 12 वर्षे होऊन गेले तरी काम पूर्ण झालेले नाही.. सरकारने वेळोवेळी अनेक वादे केले पण काम पूर्ण झाले नाही.. चौपदरीकरण तर होत नाहीच उलट या रस्त्याची चाळण झाली असल्याने हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनला आहे.. मात्र सत्ताधारी आणि कोकणातील लोकप्रतिनिधींनी या खड्ड्याबाबत आणि महामार्गाबाबत कमालीचे मौन बाळगून आहेत. त्यामुळे कोकणातील मंत्री, खासदार आमदार यांना बोलतं करण्यासाठी, जाब विचारण्यासाठी आणि कोकणातील लोकप्रतिनिधींची निष्क्रीयता जगाच्या वेशिवर टांगणयासाठी हे निवेदन आपणास सादर करत आहोत आमच्या भावना शासन दरबारी  पोहोचवाव्यात अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

You cannot copy content of this page