‘माझी माती माझा देश’ अंतर्गत मालवणात घेतली पंचप्रण शपथ

⚡मालवण ता.०९-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत “माझी माती माझा देश” या मोहिमेअंतर्गत दि. ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, शिलाफलकम (स्मारक), वीरोंको वदन, हर घर तिरंगा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मालवण नगरपरिषद देखील “माझी माती माझा देश” या मोहिमेत सहभागी झाली असून नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आज नगरपरिषद आवारातील गार्डनमध्ये मातीचा दिवा घेऊन पंचप्रण शपथ घेतली.

या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन पंचप्रण शपथ घेण्याबाबत मालवण शहरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तसेच सर्व शाळा व महाविदयालयांमध्ये आवाहन करण्यात आले. त्यानुसार मालवण तहसिल कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, मत्स्य व्यवसाय विभाग सिंधुदुर्ग, महिला बचतगट यांच्या प्रतिनिधीनी सहभाग घेऊन पंचप्रण शपथ घेतली. तसेच मालवण शहरातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, जि.प. शाळा धुरीवाडा, देऊळवाडा शाळा, रेवतळे शाळा, देसाई स्कूल, टोपीवाला हायस्कूल, कन्याशाळा, भंडारी हायस्कूल, रोझरी चर्च, जय गणेश स्कूल मधील शिक्षक व विद्यार्थी यांनीही उपस्थित राहून मातीचा दिवा घेऊन पंचप्रण शपथ घेतली.

You cannot copy content of this page