⚡बांदा ता.०९-: पाडलोस मडुरा मार्गावरील सुधीर गावडे यांच्या मांगराच्या विरुद्ध बाजूने रस्त्याला खेटून एका कंपनीने खड्डा खोदून त्यावर झाकण घातलेला धोकादायक खड्डा अखेर प्रशासनाने बुजवला. त्यामुळे पाडलोस ग्रामस्थांसह प्रवासी, वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे.
पाडलोस येथील सुधीर गावडे यांच्या मांगराच्या विरुद्ध बाजूला रस्त्याला खेटून एका कंपनीने सखल खड्डा खोदून झाकण टाकले होते. परंतु खड्ड्याची खोली जास्त असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. सदर खड्डा बुजविण्याची मागणी सर्वस्तरातून झाल्याने अखेर प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तो खड्डा बुजविला. त्यामुळे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.