⚡बांदा ता.०९-: श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत क्रांतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीती साळगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी क्रांती दिनाबद्दल माहिती सांगितली.
प्रशालेचे विद्यार्थी क्रांतिकारक सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आजाद व भगतसिंग या वेशात आले होते. त्यांनी त्यांची कामगिरी व त्यांचे कर्तुत्व सांगितले. भगतसिंग-सार्थक वालावलकर, चंद्रशेखर आजाद – मानस परब, सुखदेव-अंश परब, राजगुरू-धनेश परब.
यावेळी प्रशालेच्या सहशिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर वेलांकनी रॉड्रिग्ज, तेजस्वी गावडे व प्राची परब उपस्थित होते.
