राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत वराड येथील केशव नाचिवणेकर द्वितीय

⚡मालवण ता.०९-: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मालवण तालुक्यातील वराड येथील केशव नाचिवणेकर याने द्वितीय क्रमांक पटकावित नेत्रदीपक यश मिळविले आहे. मुंबई येथे मंत्रालयात आमदार अदिती तटकरे यांच्याहस्ते केशव याला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून साडेचारशे पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक- अलिशा मोहिते (सांगली), द्वितीय क्रमांक (विभागून)- केशव नाचिवणेकर (सिंधुदुर्ग) व प्रवीण काजळे (बीड) तसेच उत्तेजनार्थ प्रफुल माळी (धुळे), विशेष बक्षीस लहान गट – प्रणाली पोवार (कोल्हापूर), प्रभाजन फडतरे (सांगली) यांनी यश मिळविले. सर्व विजेत्यांना मंत्रालयात आम. अदिती तटकरे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

वराड येथील केशव नाचिवणेकर याने यापूर्वीही विविध राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धामध्ये बक्षीसे मिळवत मालवण तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उमटवले आहे. राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेत यश मिळविल्याने केशव याचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page