Headlines

चिंदर गावातील गुरांना चाऱ्यातून सायनाईड विषबाधा झाल्याचा प्राथमिक अहवाल

आ. वैभव नाईक यांनी घेतलेल्या बैठकीत डॉ. प्रशांत कांबळे यांची माहिती ⚡कणकवली ता.१२-: मालवण तालुक्यातील चिंदर गावात साथीच्या रोगाने गुरे दगावण्याचे प्रमाण सुरूच असून आम. वैभव नाईक यांनी मुंबई विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांच्याशी संपर्क साधत गुरांच्या साथ रोगावर उपायोजना करण्याची सूचना केली होती. डॉ. प्रशांत कांबळे यांनी सिंधुदुर्ग जिल्हयात दाखल होत…

Read More

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात दीपक केसरकर यांचे मंत्रीपद टिकेल का…?

डाॅ. जयेंद्र परुळेकर; राज्यातील सत्ता नाट्य म्हणजे सर्कस सावंतवाडी ता.१२-:* राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरुन रात्रीच्या वेळी होणाऱ्या बैठका पाहता स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचे मंत्रीपद टिकेल का..? की ते भाजपमध्ये जातील असा सवाल ठाकरे शिवसेनेचे प्रवक्त डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.श्री.परुळेकर यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध दिले त्यात म्हटले की,राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू आहेत. आता…

Read More

कोल्हापूर विभागीय अदिश स्वीकृती समितीवर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल गजानन नाईक यांचा पत्रकार संघातर्फे सन्मान

⚡सावंतवाडी ता.१२-: कोल्हापूर विभागाच्या अधिस्वीकृती समितीवर सदस्य पदी ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांची निवड झाल्याबद्दल सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने यांना शुभेच्छा देण्यात आल्या.पुष्पगुच्छ देऊन त्यांचे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले महाराष्ट्र शासनाने पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या नियुक्ती केल्या असून कोल्हापूर विभागाच्या अधिस्वीकृती समितीवर सावंतवाडीचे जेष्ठ पत्रकार गजानन नाईक यांची नियुक्ती…

Read More

एक रुपयात पीक विमा योजनेत सहभागी व्हा…

मालवण ता. कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांचे शेतकऱ्यांना आवाहन.. ⚡मालवण ता.१२-: राज्य शासनाकडून सर्वसामावेशक पीक विमा योजना म्हणून शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा मिळणार आहे. या पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पीक विमा पोर्टल १ जुलै २०२३ पासून सुरू झाले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२३ ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे जास्तीत जास्त…

Read More

समाजाचे नाव असेच उज्वल करा

मामा माडये:सुकळवाड येथे भंडारी समाज गुणगौरव सोहळा संपन्न.. ⚡मालवण ता.१२-: तुम्ही सारे विद्यार्थी हे पुढील काळातील समाजाचे भविष्य आहात. त्यामुळे तुमची उत्तरोत्तर प्रगती होणे गरजेचे आहे. त्यासाठी भंडारी समाज सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे ठाम उभा राहिल. आजची समाजाच्या कौतुकाची थाप तुम्हाला खरी प्रेरणा देईल. कारण तुमचे प्रथम गुरू आई वडील दुसरे शिक्षक आणि तिसरा गुरू…

Read More

बेरोजगारांना शिक्षक नियुक्तीसाठी ठाकरे सेनेचे १७ रोजी धरणे आंदोलन

जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता १२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदावर सेवानिवृत्त शिक्षकाना नियुक्त करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा. त्याऐवजी जिल्ह्यातील बेरोजगार डी एड पदवीधारक उमेदवारांना संधी द्यावी. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना पक्षाच्या वतीने १७ जुलै रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख…

Read More

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जुलै विविध समाजोपयोगी कार्यक्रम

⚡कणकवली ता.१४-: शिवसेना नेते तथा कोकण सिंचन महामंडाळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार १४ जुलै विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ सकाळी ७ वा. कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त भगवती मंगल कार्यालयात येथे १४ रोजी सकाळी १०.३० वा. गुणवंत विद्यार्थ्यांचा…

Read More

नगराध्यक्षपदाचा राजीनामा देताना बबन साळगावकर भांग पिऊन होते काय…?

प्रतीक बांदेकर ; नगराध्यक्ष पदाच्या काळात उल्लेखनीय काम दाखवा.. ⚡सावंतवाडी ता.१२-: दीपकभाईच्या नावावर मिळालेलं नगराध्यक्ष पद ७ वर्ष उपभोगल्या. नंतर जनमताचा अनादर करून राजीनामा दिला होता तेव्हा आपण भांग पिऊन होता काय? असा सवाल शिंदे गटाचे युवक शहराध्यक्ष प्रतीक बांदेकर यांनी उपस्थित केला.दरम्यान साळगावकरांनी पहिल्यांदा आपलेल्या आंदण म्हणून मिळालेले नगराध्यक्ष पदाच्या काळात कोणतेही उल्लेखनीय काम…

Read More

भोसले पॉलिटेक्निकचा तृतीय वर्ष निकाल जाहीर…

९१.८९ % गुणांसह सोमेश राजे कॉलेजमध्ये प्रथम_ ⚡सावंतवाडी ता.१२-: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत सुयश प्राप्त केले आहे. तृतीय वर्ष कॉम्प्युटर विभागातील विद्यार्थी सोमेश संजय राजे याने 92 टक्के गुणांसह संस्थेमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला. कॉलेजच्या इतर विभागांचा निकालही उत्कृष्ट…

Read More

बांदा निमजगा शाळा मोडकळीस आल्याने शिवसेना पदाधिकारी आक्रमक…

शाळेत धडक देत विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांना धरले धारेवर बांदा/प्रतिनिधीशहरातील निमजगा येथील जिल्हा परिषदेची शाळा इमारत हि मोडकळीस आली असून केव्हावी कोसळण्याच्या स्थितीत आहे. जीर्ण इमारतीमुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने आज शिवसेनेचे सावंतवाडी तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व पालक यांनी शाळेत धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी विस्तार अधिकारी…

Read More
You cannot copy content of this page