बांदा पोलीस ठाण्यातील होमगार्ड पथकाचा स्वातंत्र्यदिनी सत्कार…

२४ पर्यटकांची केली होती सुटका:मंत्री केसरकर यांनी सिंधुदुर्गनगरी येथे केला सन्मान..

बांदा/प्रतिनिधी
घारपी (ता. सावंतवाडी) येथे मुसळधार पावसात धबधब्याखाली अडकलेल्या २४ पर्यटकांची सुखरूप सुटका केलेल्या बांदा पोलीस ठाण्यातील होमगार्ड पथकाचा स्वातंत्रदिनी ओरोस येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले.


२३ जुलै रोजी सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. याचा फटका म्हापसा गोवा येथील २४ पर्यटकांच्या ग्रुपला बसला. दुर्गम घारपी गावात वर्षा पर्यटनासाठी आलेले पर्यटक याठिकाणी अडकले. या पर्यटकांना बांदा पोलीस व होमगार्ड पथकाने सुखरूप बाहेर काढले.
या पथकात होमगार्ड प्रभारी तालुका समादेशक अधिकारी विश्वजीत एकनाथ भोगटे, फलटण नायक भागू भैरू पाटील, जवान विनायक सावंत, शंकर मेस्त्री, सखाराम गवस, शिवशंकर सावंत, शिवशंकर देसाई यांचा समावेश होता. या सर्वांच्या कामगिरीसाठी शिक्षणमंत्री श्री केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल उपस्थित होते.

You cannot copy content of this page