दांडेली गावात कृषीविषयक माहिती सेवा केंद्राचे उद्घाटन

⚡मालवण ता.१६-: डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या कार्यानुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत दांडेली गावामध्ये कृषीदूतांचे आगमन होऊन कृषीविषयक माहिती सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

दांडेली ग्रामपंचायत येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात सरपंच श्री.निलेश आरोलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फित कापून कृषि विषयक माहिती सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच दादा पालीयेकर, ग्रामसेवक श्रीधर राऊत, ग्रामपंचायत सदस्य उमा पांगम, प्रगतशील शेतकरी दिपक नाईक, अशोक सिद्धयी तसेच शेतकरी उपस्थित होते.

यावेळी प्रगतशील शेतकरी दिपक नाईक व अशोक सिद्धयी यांनी उपस्थित विद्यार्थी शेतकरी वर्गाला शेती विषयक विविध घटकांबाबत मार्गदर्शन करत चर्चा केली. तसेच सरपंच निलेश आरोलकर यांनी विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले आणि भविष्यातील सर्व शेतीविषयक उपक्रमांसाठी प्रोत्साहन देत कौतुक केले. ग्रामसेवक श्रीधर राऊत यांनी विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु.समीर भाडळे, गितक वळंजू, कारमुगिलन टी.पी., अमोल गोसावी, मनन पटेल, रोहन पवार, दिप महाडकर यांनी विशेष मेहनत घेतली.

You cannot copy content of this page