येत्या दोन दिवसात कचरा उचल करण्यासाठी मालवणात दाखल होणार मिनी कचरा गाड्या

सौरभ ताम्हणकर यांनी वेधले होते नगरपालिकेचे लक्ष

⚡मालवण ता.१६-: मालवण शहरात कचऱ्याची वाढती समस्या आणि गल्लो-गल्लीतील कचरा उचल करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कचरा उचल करण्याच्यादृष्टीने मिनी कचरा गाड्या मालवण नगरपालिकेने उपलब्ध कराव्यात अशी मागणी मालवण मधील भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी मालवण नगरपालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे केल्यावर याबाबत नगरपालिकेकडून घंटागाड्यासाठी निविदा काढली गेली येत्या दोन दिवसात ठेका पद्धतीने मालवण शहरात पाच मिनी कचरा गाड्या दाखल होत असल्याने श्री ताम्हणकर यांनी प्रशासक व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे आभार व्यक्त केले आहेत

छोट्या कचऱ्याचा गाड्या म्हणजे मिनी कचरा गाड्या मालवण नगरपालिकेकडे नसल्याने गल्लोगल्लीतील कचरा उचल करण्यात मोठी समस्या निर्माण होत होती त्यामुळे अनेक ठिकाणी कचरा साठून राहत आहे. यासाठी नगरपालिकेने मिनी कचरा गाड्या उपलब्ध कराव्यात अशी मागणी मालवण मधील भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी मालवण नगरपालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे केल्यावर याबाबत नगरपालिकेकडून घंटागाड्यासाठी निविदा काढण्यात आली असून येत्या दोन दिवसात पाच मिनी घंटागाड्या उपलब्ध होणार आहेत.

मालवण शहरातील कचरा समस्येबाबत नेहमीच जागरूक राहून युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर हे कार्यरत असतात. वेळोवेळी स्वच्छता मोहिमांचे आयोजनही ताम्हणकर यांच्याकडून करण्यात येते. मालवण शहरात नगरपालिकेकडून कचरा उचल होत असताना यात कचरा गाड्यांची कमतरता दिसून येते. मोठ्या कचरा वाहक गाड्यांबरोबरच घराघरात व छोट्या गल्ली बोळातील कचरा उचल करण्यासाठी आवश्यक छोट्या कचरा गाड्या यांच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी कचरा उचल होत नाही. यामुळे कचरा साचून दुर्गंधी होत आहे. या समस्येबाबत सौरभ ताम्हणकर यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे लक्ष वेधत छोट्या कचरा गाड्या उपलब्ध कराव्यात अशी मागणी केली. यावेळी अधिकारी निखिल नाईक यांच्यासह निशय पालेकर, राकेश सावंत, फ्रान्सिस फर्नांडिस ,चंद्रकांत मयेकर अआदी उपस्थित होते.

सौरभ ताम्हणकर यांच्या या मागणी नंतर नगरपालिकेने मिनी कचरा गाड्या ठेका पद्धतीने उपलब्ध केल्या गेल्याने लेखी निवेदन न देताही समस्या लक्षात आणून दिल्यावर मुख्याधिकाऱ्यांनी कचरा गाडीप्रश्नी तात्काळ कार्यवाही केल्याने सौरभ ताम्हणकर यांनी मुख्याधिकारी श्री. जिरगे यांचे आभार मानले आहेत. या गाड्या उपलब्ध झाल्यावर मालवण शहरातील कचरा समस्या दूर होण्यास मदत होईल, असेही ताम्हणकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मालवण मच्छी मार्केट समोरील परिसरात कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य असल्याने याबाबत सौरभ ताम्हणकर यांनी नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधल्यावर हा कचरा तात्काळ दूर करून साफसफाई करण्यात आली. याबद्दलही ताम्हणकर यांनी न. प. प्रशासनाचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page