Headlines

मळगाव घाटीत आढळला मृतदेह

सावंतवाडी : तेरेखोल समुद्रात मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेला माजगाव-कुंभारवाडी येथील ४८ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. संबंधिताचा मृतदेह आज सकाळी मळगाव घाटीत संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे.

महेश लक्ष्मण पेडणेकर (वय ४८, रा. माजगाव कुंभारवाडी, ता. सावंतवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी मित्रासह तेरेखोल समुद्रात मासे पकडण्यासाठी तो गेला होता. मात्र, उशिरापर्यंत घरी न परतल्याने पत्नीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात नापता नोंद करण्यात आली. दरम्यान, आज त्यांचा मृतदेह मळगाव घाटीत दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, माजी सभापती राजू परब यांच्यासह
ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

You cannot copy content of this page