सौरभ ताम्हणकर यांच्या पाठपुराव्यानंतर मालवण मच्छी मार्केटमधील मासे कापण्याच्या शेडची दुरुस्ती पूर्ण
⚡मालवण ता.०४-: मालवण शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या मच्छिमार्केटच्या बाहेरील मासे कापण्याच्या पत्राशेडच्या दुरावस्थे बाबत युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी मालवण नगरपालिकेचे लक्ष वेधल्यानंतर नगरपालिकेकडून या शेडची दुरुस्ती करण्यात आली आहे. मालवण मधील मच्छी मार्केटमधील मासे कापण्याच्या शेडची दुरावस्था त्या ठिकाणी मासे कापणाऱ्या महिलांनी सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर मालवण मच्छिमार्केट…
