⚡मालवण ता.०४-: नगर वाचन मंदिर मालवण यांच्या वतीने यावर्षी प्रथमच मालवण तालुकास्तरीय दिवाळी अंक वाचक स्पर्धा दोन विभागात घेण्यात येणार आहे. पहिल्या विभागामध्ये ७ ते १४ वर्ष वयोगटातील मुले तसेच दुसऱ्या गटात वय वर्ष १५ व त्यावरील सर्व अशा दोन गटांमध्ये स्पर्धा होणार आहे.
दिवाळी निमित्त नगर वाचन मंदिर यांच्या वतीने तालुकास्तरीय दिवाळी अंक वाचक स्पर्धा दोन विभागामध्ये आहे. यामध्ये पहिल्या गटातील मुलांसाठी दिवाळी अंकातील कथांवर कथाकथन स्पर्धा दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात होईल. तसेच दुसऱ्या गटासाठी दिवाळी अंक योजनेतील कोणत्याही एका अंकावर रसग्रहणात्मक विवेचन (वक्तृत्व) करावे यासाठी पाच ते सात मिनिट वेळ देण्यात येणार आहे. ही स्पर्धा दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी संबंधित वाचक किंवा त्यांचे नातेवाईक तसेच मित्र सहभागी होऊ शकतात. दोन्ही गटातील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्यानी अधिक माहितीसाठी संजय शिंदे मोबा नंबर ९४२२२३४९५० संपर्क साधावा व सहभागी व्हावे असे आवाहन नगर वाचन मंदिरच्या वतीने करण्यात आले आहे.
