मालवणात २६ रोजी मराठी शुद्धलेखन स्पर्धा…

⚡मालवण ता.१७-:
‘मराठी भाषा दिवस’ उपक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब, मालवण यांच्यावतीने मालवण तालुकास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कन्याशाळा, मालवण येथे करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी लेखणी, कागद व मजकूर आयोजकांकडून पुरविला जाणार आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना चषक व रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार असून अधिकाधिक नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी असून नावनोंदणीसाठी ७०५७९०६६८९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page