इन्सुली भिसेवाडीत विहिरीत पडलेला बिबट्या वनविभागने काढले सुखरूप बाहेर…

⚡सावंतवाडी ता.१८-: इन्सुली भिसेवाडी येथे पहाटेच्या सुमारास एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली. यानंतर वनविभागाच्या टीमने त्याला बाहेर काढत ताब्यात घेतले. त्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला वन अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इन्सुलीतील अमित धुरी यांच्या मालकीच्या विहिरीत हा बिबट्या पडला होता. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. रात्रीच्या सुमारास भक्षाचा पाठलाग करत असताना या बिबट्याचा अंदाज चुकला आणि तो थेट विहिरीत कोसळला. आज पहाटे विहिरीतून डरकाळ्यांचे आवाज येऊ लागल्याने ही घटना श्री. धुरी यांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. बिबट्याला बाहेर काढल्यानंतर तज्ज्ञांकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून तो पूर्णपणे स्वस्थ असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली. वनविभागाच्या या यशस्वी मोहिमेबद्दल इन्सुली ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page