5 वर्षे प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणून काम करा…

माजी आ. वैभव नाईक ;
आडेली जि. प. सदस्य विजय नाईक यांचा सत्कार..

⚡वेंगुर्ला ता.१७-: आज आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने विश्वास दर्शवून जी आपल्याला संधी दिली आहे, त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करा. मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतला भेटी देऊन गावातील जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते अग्रक्रमाने सोडवा. जि. प. सदस्य म्हणून मिळणाऱ्या निधीचा उपयोग योग्य प्रकारे करून पुढील 5 वर्षे प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणून काम करा, तरच सत्कार सार्थकी लागेल, असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी आडेली ( ता. वेंगुर्ला ) येथे बोलताना केले.
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक यांचा आज मंगळवारी (17 फेब्रुवारी )आडेली आंबेडकरनगर येथे माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर ,प्र. तालुकाप्रमुख निलेश चमणकर, शहरप्रमुख शैलेश परुळेकर ,आडेलीचे मानकरी जयवंत धर्णे, आडेली उपसरपंच परेश हळणकर, आडेली माजी सरपंच भारत धर्णे, माजी उपसरपंच घन:श्याम नाईक, वायंगणी माजी सरपंच सुमन कामत, युवा कार्यकर्ते स्वप्नील गडेकर, ओंकार नाईक, कुडाळ तालुकाप्रमुख श्री. बोभाटे, अशोक गावडे, फक्री आडेलकर, पुरुषोत्तम धर्णे , माजी सदस्य प्रशांत मुंडये, तुषार कांबळी, सुधीर मुंडये, मठ शाखाप्रमुख अरविंद बागायतकर आदी उपस्थित होते. यावेळी आ.वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाट्न झाले. सर्वप्रथम प्रकाश गडेकर यांच्या हस्ते आ. नाईक यांचा सत्कार करण्यात आला. आ. वैभव नाईक यांच्या हस्ते व शिवसैनिक यांच्यामार्फत प्रकाश गडेकर यांच्या हस्ते विजय नाईक यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आ. नाईक यांच्या हस्ते स्काऊट पथकातील राज्यस्तरीय यशप्राप्त आडेली हायस्कुलचे ( आडेली शाळा नं. 1 चे माजी विद्यार्थी) विद्यार्थी
तन्मय अवसरे व भालचंद्र आगलावे यांचा सत्कार करण्यात आला. तर विजय नाईक यांच्या हस्ते मार्गदर्शक शिक्षक सीताराम लांबर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी आ. नाईक म्हणाले, जिल्ह्यात आज गवारेडे व वन्यप्राण्यांचा प्रश्न आहे. जलजीवन, रोजगार प्रश्न आहेत. आंबा उत्पादक शेतकरी पूर्णपणे नुकसानीत आहे. याबाबत शासनाने नुकसानभरपाई जाहीर करणे आवश्यक आहे. अपक्षासह जिल्हा परिषद विकास गट स्थापन करण्यात आला असून विकासाच्या मुद्द्यावर आमचा लढा कायम राहील. वेंगुर्ला तालुक्यात ठाकरे शिवसेना पक्षाला मिळालेले यश पाहता
संघटना वाढीसाठी “नवीन कार्यकर्त्यांना ” संधी देणार, असे त्यांनी जाहीर केले. तर प्रकाश गडेकर, निलेश चमणकर यांचे विशेष कौतुक केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना विजय नाईक यांनी आडेलीवासिय व आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांचे आभार व्यक्त केले. आडेली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी, येथील जलजीवनचे प्रश्न, आडेली गावठणवाडी येथील पाण्याचा प्रश्न, आडेली खुटवळवाडी अपूर्ण असलेले काम, येथील नागरिकांना नळपाणी पुरवठा व अन्य प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या मतदारसंघात अनेक विकासकामे ठप्प आहेत, ती पूर्णतःवास नेणार. तसेच दर महिन्याला प्रत्येक ग्रामपंचायतला भेटी देऊन येथील नागरिकांच्या, गोरगरिबांच्या विकासासाठीच प्रयत्नशील राहणार, असेही त्यांनी बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष कार्यकारिणीचे अध्यक्ष उदय आडेलकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page