हुमरमळा वालावल येथे जि प सदस्य रुपेश पावसकर यांचा सत्कार…

⚡कुडाळ ता.१८-: हुमरमळा वालावल येथील श्री देव रामेश्वर मंदीरांमध्ये महाशिवरात्र उत्सवाचे औचित्य साधुन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर आणि नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा सत्कार देवस्थान कमीटीच्या वतीने करण्यात आला. हुमरमळा वालावल गावातील ज्येष्ठ नागरिक त्रिंबक देसाई व श्री देव रामेश्वर देवस्थान उपसल्लागार समिती खजिनदार प्रकाश परब यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी अतुल बंगे, पंकज देसाई, विजय कांबळी, वैभव मांजरेकर, शरद वालावलकर, संतोष जाधव, सौ रुद्रा रुपेश पावसकर, सौ अर्चना बंगे उपस्थित होते.

You cannot copy content of this page