मालवण शहरात भाजप तर्फे विविध विकास कामांचा शुभारंभ

⚡मालवण ता.०४-: मालवण शहरात भाजपतर्फे माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज निलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ, नगरपरिषद पर्यटन सुविधा केंद्र समोरील रस्ता डांबरीकरण करणे, मेढा रासम गल्ली डांबरीकरण करणे, मेढा मुरलीधर मंदिर ते रोझरी चर्च जंक्शन रस्ता डांबरीकरण करणे, इंदिरा कॉम्प्लेक्स ते नगरपरिषद रस्ता डांबरीकरण करणे, भरड नाका ते हडकर मार्ग रस्ता डांबरीकरण करणे, भरड ते तारकर्ली मुख्य रस्ता नगरपरिषद हद्दीवरील रस्ता डांबरीकरण करणे, रांगोळी महाराज मठ ते लिलाव सेंटरकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, गवंडीवाडा कल्पतरु रस्ता ते मच्छि मार्केटमध्ये जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, वायरी तारकली ते गांवकरवाडा उर्वरीत रस्त्यास करव्हिंग व पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करणे, दांडी मोरेश्वर रांज ते मोरेश्वर स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण करणे, वायरी शिवनेरी चौक गर्दैरोड रस्ता डांबरीकरण करणे, साई मंदिर धुरीवाडा, समर्थ आंगण बिल्डींग, आडारी घनकचरा केंद्र ते मालवणकर घरापर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, धुरीवाडा साई मंदिर रोड ते पडवळ घर ते काजरोबा मंदिर कन्याशाळा रस्ता डांबरीकरण करणे व गटार मजबुतीकरण करणे, आदर्श नगर ते कोळगे घराकडील रस्ता डांबरीकरण करणे आदी विविध विकासकामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

यावेळी भाजपचे दत्ता सामंत, अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, दिपक पाटकर, आपा लुडबे, गणेश कुशे, आबा हडकर, अशोक तोडणकर, विजय केनवडेकर, संदीप परब, पंकज सादये, रविकिरण तोरसकर, महेश सारंग, पूजा सरकारे, पूजा करलकर, अन्वेषा आचरेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, विलास मुणगेकर, प्रमोद करलकर, मोहन वराडकर, राजू बिडये, मंदार लुडबे, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, नारायण लुडबे, बंड्या पराडकर, निनाद बादेकर, पंकज पेडणेकर आदी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page