शिवजयंतीनिमित्त नूतन विद्यालय कळणे येथे चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद….

⚡दोडामार्ग ता.१८-:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नूतन विद्यालय कळणे येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली असून प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक, युद्धनीती, महाराजांचा दरबार, गड-किल्ले आदी विविध ऐतिहासिक विषयांवर चित्रकलेच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धेचे आयोजन प्रशालेचे शिक्षक संजय तायवाडे यांनी केले होते, तर स्पर्धेस प्रशालेचे कर्मचारी मधुकर गावकर यांनी प्रायोजकत्व दिले.
स्पर्धेच्या निकालात लहान गटात हर्षाली विष्णू नार्वेकर हिने प्रथम क्रमांक मिळविला, तर प्रसाद प्रकाश देसाई याने द्वितीय क्रमांक पटकावला. मोठ्या गटात मयुरी रामचंद्र गावकर हिने प्रथम क्रमांक मिळविला, तर उर्वी संदेश देसाई हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेचे परीक्षण प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक प्रशांत राऊळ व उमेश देसाई यांनी केले. यावेळी शिक्षक सतीश धर्णे, अच्युत गावडे तसेच शिक्षिका निकिता सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page