सौरभ ताम्हणकर यांच्या पाठपुराव्यानंतर मालवण मच्छी मार्केटमधील मासे कापण्याच्या शेडची दुरुस्ती पूर्ण

⚡मालवण ता.०४-: मालवण शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या मच्छिमार्केटच्या बाहेरील मासे कापण्याच्या पत्राशेडच्या दुरावस्थे बाबत युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी मालवण नगरपालिकेचे लक्ष वेधल्यानंतर नगरपालिकेकडून या शेडची दुरुस्ती करण्यात आली आहे.

मालवण मधील मच्छी मार्केटमधील मासे कापण्याच्या शेडची दुरावस्था त्या ठिकाणी मासे कापणाऱ्या महिलांनी सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर मालवण मच्छिमार्केट परिसराची सौरभ ताम्हणकर आणि सहकाऱ्यांनी १५ मे रोजी पाहणी करून नगरपालिका प्रशासनाला त्याठिकाणी पाचारण करून शेडची दुरावस्था दाखवली होती. त्यावेळी मासे कापण्याच्या ठिकाणाच्या पत्राशेडची दुरुस्ती करण्याची मागणी ताम्हणकर यांनी केली होती. नगरपालिका प्रशासनाने शेड च्या दुरुस्ती कामाला मान्यता देत त्याची निविदा प्रक्रिया करून हे काम पूर्णत्वास नेले आहे. शेडची दुरुस्ती झाल्याने मच्छी कापणाऱ्या महिलांनी सौरभ ताम्हणकर यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, या शेड मध्ये काही ठिकाणी पत्र कापले आहे त्याठिकाणी सिमेंट किंवा भुश्याचे मिश्रण भरण्यात येईल तसेच शेड आवश्यक असलेली पावसाळी पन्हळ लावण्यात येईल, अशी ग्वाही सौरभ ताम्हणकर यांनी दिली.

You cannot copy content of this page