क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज यांचा वधुवर परिचय मेळावा २२ फेब्रुवारी रोजी…

⚡मुंबई दि.१८-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज यांच्या वधुवर सूचक समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील घाडीगांवकर समाजाचा वधुवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४.०० वाजता सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बिल्डिंग, शारदा टॉकीजच्या बाजूला, दादर (पूर्व), मुंबई येथे होणार आहे.

यंदा या मेळाव्याचे २२वे वर्ष असून समाजातील उपवर युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या स्वप्नातील जोडीदाराची निवड करावी, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यात प्रत्यक्ष चर्चा सत्रासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते, ज्यामुळे पालक व इच्छुक वधू-वरांना प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळते.

समाजाच्या काळाचौकी येथील कार्यालयात दर मंगळवार व बुधवार या दोन दिवशी वर्षभर नोंदणी सुरू असते. इच्छुकांनी आपली नोंदणी दिनांक २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत कार्यालयात करावी, असेही सूचित करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी समिती प्रमुख श्री. विकास शिवराम घाडीगांवकर (८८७९७७१९६५), गजानन आ. घाडीगांवकर (९४०५३७९५८६), रामचंद्र यशवंत घाडीगांवकर (९१६७७८७५१२), रमेश घाडीगांवकर (९९६९५४७०६७), रघुनाथ स. घाडीगांवकर (९८६९६५४७६८) तसेच चंद्रकांत घाडी (८६५५४३४८९९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वधुवर समितीतर्फे करण्यात आले आहे. समाज बांधवांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page