मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला वेत्ये ग्रामस्थांचा पाठींबा…

सरपंच गुणाजी गावडे:सावंतवाडी तालुका मराठा समाजाच्या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होणार..

सावंतवाडी -शासनाकडुन सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असुन मराठा समाजाला आरक्षणापासुन वंचित ठेवण्यात आले आहे. मराठा समाजाचे नेते श्री. मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषण करत आहेत. मराठा समाजामध्ये आर्थिक मागासलेपणा असलेल्यांची संख्या बरिच जास्त असुन हुशार व होतकरू विद्यार्थी शैक्षणीक सवलती पासुन वंचित राहत आहे म्हणून वेत्ये ग्रामस्थांनी आज एकमुखी जरांगे पाटीलांना बैठक घेऊन सर्मथन दिले आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत महत्वाचे आहे.मराठा आंदोलनास पाठींबा म्हणुन सकल मराठा समाज वेत्ये वासियांचा वतीने दि.३/११/२०२३ रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता रुक्मिणी ट्रान्स्पोर्ट ऑफीस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मराठी बांधवांनी उपस्थित राहत एकमुखी पाठिंबा दिला व सकल मराठा समाज सावंतवाडी तालुका यांनी आयोजित केलेल्या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे ठरविण्यात आले

You cannot copy content of this page