सिताराम गावडे:मराठा बांधव, भगिनींनो मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन..
⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी मराठा समाज भव्य मोटरसायकल रॅली बुधवार दि.८ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी शहरातून काढण्यात येणार आहे. त्यासाठी सकाळी १० वाजता राजवाडा येथे जमणार आहोत. याचे नियोजन रविवारी सायंकाळी पाच वाजता आर पी डी हायस्कूल मध्ये बैठकीत करण्याचे ठरविण्यात आले आहे. मराठा बांधव, भगिनींनो मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा समाज तालुका अध्यक्ष सिताराम गावडे व विकास सावंत यांनी केले.
आर पी डी हायस्कूल सभागृहात तालुका अध्यक्ष सिताराम गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विकास सावंत यांनी मार्गदर्शन केले.
सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे, विकास सावंत, पुंडलिक दळवी, आकाश मिसाळ, अपर्णा कोठावळे, सतीश बागवे, राजेंद्र म्हापसेकर, प्रशांत कोठावळे,राजू तावडे, गौरेश सावंत, भारती मोरे, विनोद सावंत, दत्ताराम सावंत,सौ पुजा दळवी, विनायक सावंत, चंद्रकांत राणे, संजय लाड, उमेश गावकर, रणजित सावंत , गुणाजी गावडे, अँड निता गावडे , निलीमा चलवाडी, मेघश्याम काजरेकर, नितीन गावडे, संतोष सावंत,हेमचंद्र सावळ देसाई, मनोज सावंत,कैलास परब,शिवदत्त घोगळे, प्रसाद राऊळ, रवींद्र गावकर, सुप्रिया धारणकर, रेश्मा परब,सौ सिमा सोनटक्के, जितेंद्र गावकर, गोविंद सावंत आणि मान्यवर उपस्थित होते.
विकास सावंत म्हणाले, सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडले पाहिजे म्हणून मराठा समाजाला जागृत करायला हवं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त दहा वर्षांसाठी आरक्षण ठेवले. मात्र त्यानंतर राजकीय सोयीसाठी वाढत गेले आणि आज मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करावी लागते. फाशी दिली तरी जामीन मिळतोय मात्र जातीयवाचक गुन्ह्यात जामीन मिळत नाही. जातीयवाचक गुन्हा अटक झाली पाहिजे त्यावेळी राज्यकर्त्यांनी कायदा करताना बारकावे पाहीले नाही. ज्यावेळी कायदा केला जात होता तेव्हा आणि अन्य प्रकरणात दबावगट निर्माण झाला पाहिजे होता. कायदेशीर बाजू पाहिली पाहिजे
राजकारण देखील आपल्या समाजाचे केले पाहिजे. इपेंरिअल डाटा नाही म्हणून डावलत आहेत. जनगणना आहे त्या आधारे आरक्षण जाहीर करा.महिलांना आरक्षण २०२८ नंतर मिळणार नाही. शहर व ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
सिताराम गावडे म्हणाले, जरांगे पाटील यांना पाठिंबा आणि मराठा समाज आरक्षणासाठी बुधवारी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील बंधु भगिनींनो आणि विद्यार्थ्यांनी या मोटरसायकल रॅली मध्ये सहभागी व्हा. मराठा समाज वास्तव लक्षात घेऊन एकजूट दाखवून देण्याची वेळ आली आहे. राजकीय पादत्राणे आणि मतभेद बाजूला ठेवून एकजूट दाखवून द्या.
यावेळी उपस्थित मान्यवर उपस्थितांनी विचार मांडले.
