Headlines

नौसेना दिनाच्या नियोजनाचा आयुक्तांनी घेतला आढावा…

⚡ओरोस ता.१७-: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत 4 डिसेंबर रोजी नौसेना दिनाचा भव्य दिव्य समारंभ पार पडणार आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेऊन काम करण्याचे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिले.आयुक्त डॉ कल्याणकर यांनी दौऱ्याच्या अनुषंगाणे कामकाजाचा आढावा घेतला. ४ डिसेंबर रोजी नौसेना…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्या क्रिकेट संघ निवड चाचणी 22 नोव्हेंबर रोजी…

⚡सावंतवाडी ता.१६-: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्यासाठी १६ वर्षांखालील मुलांचा लेदर बॉल क्रिकेट संघ निवड सावंतवाडी जिमखाना मैदानावर बुधवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता घेण्यात येणार आहे. ०१ सप्टेंबर २००८ नंतर जन्मलेल्या तसेच जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुलांना निवड चाचणीत भाग घेता येणार आहे. खेळाडूंनी पुर्ण गणवेशात, आधार कार्ड, जन्म…

Read More

मालवण तालुक्यातील वायंगणी येथील वृद्ध बेपत्ता….

आचरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तुकाराम बाबुराव वायंगणकर हे घरी काहीही न सांगत २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजताचे दरम्यान वायंगणी राहते घरातून निघुन गेले होते त्यानंतर त्यांची शोधाशोध केली असता राठीवडे मालवण येथील चुलत नातेवाईक यांचेकडे जाऊन राहिले होते. यानंतर दि. ०३ नोव्हेंबर रोजी तुकाराम वायंगणकर हे पुन्हा राठीवडे येथून आपणास मुंबई केईएम हॉस्पीटल…

Read More

वेंगुर्लेत राबविली सागर सुरक्षा कवच मोहीम…

सागरी किनारपट्टी सुरक्षेच्या दृष्टीने राबविली मोहीम.. ⚡वेंगुर्ले ता.१६-: सागर किनारपट्टीच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागर सुरक्षा कवच मोहिम आज गुरुवारी (१६ नोव्हेंबर) वेंगुर्ल्यात राबविण्यात आली.   रेडी किनारपट्टी ते हरिचरणगिरी किनारपट्टी पर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. तसेच मानसीश्वर मंदिर समोर मुख्य मार्गावर, रेडी चेक पोस्ट आदी ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या…

Read More

कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची 18 रोजी सभा…

⚡कणकवली ता.१६-: कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे कार्यकारणीची सभा शनिवार 18 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 10.30 वा. संस्थेच्या पेन्शनर भवन, कलमठ येथे कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. सभेत पेन्शन संबंधात पेन्शन संबंधात महत्त्वाच्या कामकाजावर व.सदस्यांच्या /सभासदांच्या मागणीवर, सूचनावर चर्चा होणार आहे .तरी कार्यकारणीचे सदस्य यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सिताराम उर्फ दादा…

Read More

आकाश कंदील स्पर्धेत रुचा चव्हाण, शिल्पा खोत तर किल्ला बनविणे स्पर्धेत वैभवी कोळगे प्रथम…

⚡मालवण ता.१६-: आरमारी गाबीत समाज संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या किल्ला व आकाश कंदील स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून लहान गटात रुचा रामचंद्र चव्हाण तर खुल्या गटात सौ. शिल्पा यतीन खोत यांनी प्रथम क्रमांक पटकावीला. किल्ला बनविणे स्पर्धेत वैभवी संदीप कोळगे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. आरमारी गाबीत समाजाच्या वतीने दिवाळी निमित्त आकाश कंदील…

Read More

केणीवाड्यातील नळ पाण्याच्या प्रतीक्षेत…

कोरड्या नळाला पाणी कधी येणार : समीर नाईक यांचा सवाल : अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईटही बंदावस्थेत.. ⚡बांदा ता.१६-: पाडलोस केणीवाडा येथील अनेक वर्षे रखडलेल्या नळ पाणी योजनेला सुरळीत होण्यासाठी मुहूर्त मिळेना. नळ ग्रामस्थांच्या दारात आले परंतु अद्यापही पाणी आले नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे नळ पाणी योजनेच्या मीटरचे विद्युत बिलही आले मात्र ग्रामस्थांच्या घसा कोरडाच राहिला….

Read More

ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. असिम सरोदे शनिवारी सिंधुदुर्गात…

⚡कुडाळ ता.१६-: ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. असिम सरोदे शनिवार सिंधुदुर्गात येणार आहेत.कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील लोकांशी, पत्रकार आणि नवोदित वकिलांशी ते संवाद साधतील. त्यांच्यासोबत जेंडर राईट विश्लेषक ॲड. रमा सरोदे आणि कायदेविषयक कामकाज व्यवस्थापन तज्ञ ॲड. बाळकृष्ण निढाळकर हे उपस्थित राहणार असून कुडाळ येथील मराठा हॉल (यूनियन बँकलगत) मध्ये सकाळी १०.३०…

Read More

विविध पक्षातील कार्यकर्त्यांनचा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश…

⚡कुडाळ ता.१६-: जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. कुडाळ शहरातील विराज बांदेकर (कुडाळ शहर उपाध्यक्ष), प्रथमेश माने (कुडाळ शहर युवक अध्यक्ष), जावेद इक्बाल मेमन (कुडाळ तालुका अल्पसंख्याक सेल अध्यक्ष), यश मडवळ, सूरज राऊळ, रविराज सावंत, कार्तिक केसरकर, ऋग्वेद पारकर…

Read More

प्रा. शरद शिरोडकर यांना पीएचडी पदवी…

⚡बांदा ता.१६-: बांदा येथील रावसाहेब गोगटे-वाळके महाविद्यालयाचे हिंदी व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शरद बाबणी शिरोडकर यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी ‘शैलेश माटियानी और राजन गवस के कथा साहित्य का तुलनात्मक अध्ययन’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. या संशोधनास शोध निर्देशक म्हणून डॉ. विद्या शिंदे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. शरद…

Read More
You cannot copy content of this page