⚡कुडाळ ता.१६-: जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
कुडाळ शहरातील विराज बांदेकर (कुडाळ शहर उपाध्यक्ष), प्रथमेश माने (कुडाळ शहर युवक अध्यक्ष), जावेद इक्बाल मेमन (कुडाळ तालुका अल्पसंख्याक सेल अध्यक्ष), यश मडवळ, सूरज राऊळ, रविराज सावंत, कार्तिक केसरकर, ऋग्वेद पारकर यांच्यासह अनेक युवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
यावेळी कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी पक्षात प्रवेश केलेल्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, कुडाळ तालुकाप्रमुख आर. के. सावंत, सावळाराम अणावकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सर्फराज नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक म्हणाले की, ज्या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) पक्षांत प्रवेश केला आहे. त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. तर कार्याध्यक्ष काका कुडाळकर म्हणाले की, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम करावे. आपला पक्ष मजबूत होण्यासाठी राज्यातील नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे आपल्या पाठीशी नेहमीच आहेत.
