ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. असिम सरोदे शनिवारी सिंधुदुर्गात…

⚡कुडाळ ता.१६-: ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. असिम सरोदे शनिवार सिंधुदुर्गात येणार आहेत.
कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील लोकांशी, पत्रकार आणि नवोदित वकिलांशी ते संवाद साधतील.


त्यांच्यासोबत जेंडर राईट विश्लेषक ॲड. रमा सरोदे आणि कायदेविषयक कामकाज व्यवस्थापन तज्ञ ॲड. बाळकृष्ण निढाळकर हे उपस्थित राहणार असून कुडाळ येथील मराठा हॉल (यूनियन बँकलगत) मध्ये सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत विविध क्षेत्रातील लोकांशी चर्चा करणार आहेत. तसेच राज्यभर राबविण्यात येणा-या ‘निर्भय बनो अभियान’विषयी माहिती देणार आहेत. त्यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, पर्यावरणविषयक प्रश्न जाणून घेणार असून नवोदित वकिल मित्रांशी आणि पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. जिल्हयातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त, नवोदित वकील यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ॲड. किशोर वरक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page