सिंधुदुर्ग जिल्ह्या क्रिकेट संघ निवड चाचणी 22 नोव्हेंबर रोजी…

⚡सावंतवाडी ता.१६-: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्यासाठी १६ वर्षांखालील मुलांचा लेदर बॉल क्रिकेट संघ निवड सावंतवाडी जिमखाना मैदानावर बुधवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता घेण्यात येणार आहे.


०१ सप्टेंबर २००८ नंतर जन्मलेल्या तसेच जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुलांना निवड चाचणीत भाग घेता येणार आहे.

खेळाडूंनी पुर्ण गणवेशात, आधार कार्ड, जन्म दाखला व प्रवेश शुल्क रुपये २०० सोबत घेऊन यावे. जास्तीत जास्त खेळाडूंनी या चाचणीत भाग घ्यावा व अधिक माहितीसाठी श्री. रघुनाथ धारणकर- ९८९०८०२०९५व नंदकिशोर रेडकर- ९४०३५५९८८४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सहसचिव काशीनाथ दुभाषी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page