मालवण तालुक्यातील वायंगणी येथील वृद्ध बेपत्ता….

आचरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तुकाराम बाबुराव वायंगणकर हे घरी काहीही न सांगत २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजताचे दरम्यान वायंगणी राहते घरातून निघुन गेले होते त्यानंतर त्यांची शोधाशोध केली असता राठीवडे मालवण येथील चुलत नातेवाईक यांचेकडे जाऊन राहिले होते. यानंतर दि. ०३ नोव्हेंबर रोजी तुकाराम वायंगणकर हे पुन्हा राठीवडे येथून आपणास मुंबई केईएम हॉस्पीटल येथे डोळयाचे ऑपरेशन करण्यासाठी जात असल्याचे अ सांगून दुपारी ०२.०० दरम्याने निघून गेलेत. त्यानंतर ते कुठेही आढळून न आल्याने मुंबई येथे राहणारे नातेवाईक तसेच इतर गावचे नातेवाईक यांचेकडे शोध घेतला असता ते आजपावेतो मिळून आलेले नाहीत. सदर वृध्द व्यक्ती आढळून आल्यास आचरा पोलीस ठाण्यात कळवण्याचे आवाहन आचरा पोलिसांनी केले आहे.

⚡मालवण ता.१६-:
मालवण तालुक्यातील वायंगणी येथील वृद्ध तुकाराम बाबुराव वायंगणकर (वय 80) हे राठीवडे येथील नातेवाईक यांच्याकडून 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबईला डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी जातो असे सांगून बाहेर पडले होते मात्र त्यानंतर त्यांचा कोठेही आढळून आले नाहीत. मुंबई येथे राहणारे नातेवाईक तसेच इतर गावचे नातेवाईक यांचेकडे शोध घेतला असता सापडून न आल्याने त्यांची मुलगी सिमा तुकाराम वायंगणकर यांनी वयोवृद्ध वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर वृध्द व्यक्ती आढळून आल्यास आचरा पोलीस ठाण्यात कळवण्याचे आवाहन आचरा पोलिसांनी केले आहे.

You cannot copy content of this page