वेंगुर्लेत राबविली सागर सुरक्षा कवच मोहीम…

सागरी किनारपट्टी सुरक्षेच्या दृष्टीने राबविली मोहीम..

⚡वेंगुर्ले ता.१६-: सागर किनारपट्टीच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागर सुरक्षा कवच मोहिम आज गुरुवारी (१६ नोव्हेंबर) वेंगुर्ल्यात राबविण्यात आली.
   
रेडी किनारपट्टी ते हरिचरणगिरी किनारपट्टी पर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. तसेच मानसीश्वर मंदिर समोर मुख्य मार्गावर, रेडी चेक पोस्ट आदी ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड, वॉर्डन, सागर रक्षक सदस्य, एनसीसी कॅडेट आदी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page