Headlines

हळवलमध्ये लिंगेश्वर युवा मंडळाकडून मूर्तिकारांचा सन्मान

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना गणेशमूर्ती घडविण्यात व्यस्त असलेल्या मूर्तिकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कणकवली तालुक्यातील हळवल येथील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाने ‘मूर्तिकार सन्मान’ उपक्रम राबविला. या उपक्रमातून मूर्तिकारांना आवश्यक साहित्याचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून समाजाभिमुख कार्याची परंपरा जपली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांच्या परिश्रमाचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमाबद्दल हळवल गावातील मूर्तिकारांनी मंडळाचे आभार मानत त्यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले. तसेच अशा उपक्रमांमुळे कलाकारांना प्रोत्साहन मिळत असल्याची भावना व्यक्त करत मंडळाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष लवू परब, अरुण राऊळ, सचिव दिपेश परब, उमेश परब, दिपक राऊळ, दशरथ परब, विकास गावडे, अमोल केरकर, अनिकेत परब, यशवंत परब, मनोज धुरी, यश परब, विक्रांत परब, मंदार परब, निल परब, पार्थ परब, वैदेही परब, सोहम धुरी तसेच मंडळाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page