Headlines

‘निर्भीड पत्रकार’ पुरस्कारानंतर निलेश मोरजकर यांचा बांद्यात गौरव…

बांदा/प्रतिनिधी
बांदा महीला मराठा समाजाच्या वतीने निर्भीड पत्रकार पुरस्काराने सन्मानित झालेले ‘सकाळ’चे येथील प्रतिनिधी तथा बांदा मराठा समाजाचे संस्थापक अध्यक्ष निलेश मोरजकर यांचा शाल, श्रीफळ व रोप देऊन गौरव करण्यात आला.
बांदा ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बांदा महीला मराठा समाज अध्यक्षा सौ. स्वाती सावंत, उपाध्यक्षा सौ. ममता सावंत, सचिव सौ. माधवी गाड, सौ. अर्चना सावंत, सौ. रिना मोरजकर, सौ. लक्ष्मी सावंत, ग्रामपंचायत सदस्या सौ. रेश्मा सावंत, बांदा मराठा समाज माजी खजिनदार राकेश परब आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी श्री मोरजकर यांच्या निर्भीड पत्रकारितेचे कौतुक केले. समाजहिताच्या प्रश्नांवर त्यांनी केलेल्या निष्पक्ष व धाडसी पत्रकारितेबद्दल त्यांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये वर्षा आगलावे, सोनल धूरी, मनाली नाईक, सिद्धी माजगावकर, सुशांती सावंत, प्रियांका सावंत, रितिका माजगावकर, सुचिता धूरी, दर्शना कावले, दिव्या नाईक कोमल नाईक, कोमल चौगुले, अस्मिता माजगावकर, शुभांगी माजगावकर, सुचिता मुळीक, स्वाती सावंत, मयुरी नाईक, पूजा भाईप, रत्नप्रभा गवस, निशिगंधा सावंत, आशा सावंत आदी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा येथे नीलेश मोरजकर यांचा सत्कार करताना बांदा महिला मराठा समाजाच्या पदाधिकारी व भगिनी.

You cannot copy content of this page