Headlines

शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ‘फार्मर आयडी’ची अट शिथिल करा…

संजू परब, दिनेश गावडे यांची मागणी महसूल मंत्र्यांकडे निवेदन केले सादर..

⚡सावंतवाडी ता.०३-: आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील शेतकऱ्यांना २०२६ च्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ‘फार्मर आयडी’ची अट शिथिल करण्याची मागणी शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी केली आहे. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन तातडीने बैठक बोलावण्याची विनंती करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या भागातील अनेक शेतकरी वर्षानुवर्षे कुलकायद्यातील तसेच शासनाच्या जमिनींवर पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून त्यांना पीककर्ज देण्यात आले आहे. मात्र, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेत ‘फार्मर आयडी’ची अट असल्यामुळे या भागातील जवळपास ९० टक्के शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
२०२५ मधील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अशा परिस्थितीत कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यास त्यांची अडचण अधिक वाढणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्री, कृषिमंत्री तसेच स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक आयोजित करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून संजू परब व दिनेश गावडे यांनी केली आहे.

यावेळी निवेदन देतानामहाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची भेट घेऊन वरील पत्रान्वये निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब साहेब यांनी सादर केले.यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख दिनेश गावडे विनायक दळवी आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page