Headlines

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारी शक्ती साठी विकासाचे द्वार उघडले…

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत;मोदीजींच कार्य देशातील महिलांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील.. ⚡ओरोस ता.२१-: पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी गणेशोत्सवच्या शुभदिनी महीलांसाठी “नारी शक्ति वंदन विधेयक ” लोकसभा आणी विधानसभेत ३३% जागा आरक्षण मंजुरीसाठी आणले, आणी नारी शक्ती साठी विकासाचे द्वार उघडले. असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले. दरम्यान मागची २७ वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता.आता एक तृतीयांश…

Read More

वैभववाडी येथे राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने तालुकास्तरीय गणेश सजावट स्पर्धा

वैभववाडी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटी आयोजित सन 2023 तालुकास्तरीय गणपती आरास सजावट स्पर्धा गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर ते सोमवार 25 सप्टेंबर 2023 कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत. या स्पर्धेसाठी गणेश भक्तांनी आपल्या कुटुंबासोबत गणपती सजावटीचा एक मिनिटाचा व्हिडिओ सोबत स्वतःचे नाव गावचे नाव व मोबाईल क्रमांक सहित माहिती 9404743605/8808768570 या नंबर वर पाठवावी यासाठी…

Read More

तारकर्ली समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला वायरी समुद्र किनारी !

मालवण (प्रतिनिधी) कणकवली मधून मालवणात फिरण्यासाठी आलेला ११ मित्रांचा ग्रुप तारकर्ली येथील एमटीडीसी केंद्रासमोरील समुद्र किनारी पर्यटनाचा आनंद लूटत असताना या ग्रुपमधील सुफियान दिलदार शेख (वय २४ रा. साकेडी मुस्लिमवाडी, ता. कणकवली) या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी घडली. तर याचवेळी समुद्रात बुडणाऱ्या अन्य दोघांना वाचविण्यात यश आले. दरम्यान, काल समुद्रात…

Read More

युवतीसेना सिंधुदुर्गतर्फे गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.२०-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवतीसेना सिंधुदुर्गतर्फे गणेशोत्सवानिमित्त गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या घरी विराजमान झालेल्या गणपती व गौरी यांच्या सजावटीचा एक सेल्फी व एक व्हिडीओ काढून आपल्या नाव व पत्त्यासह ९४२१९७११५९ या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सऍपद्वारे दि. २३ सप्टेंबर पर्यंत पाठवायचा आहे. या स्पर्धेचा निकाल…

Read More

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या सिंधुदुर्गात…

दुपारी तीन वाजता सावंतवाडी: पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी घेणार गणरायाचे दर्शन.. ⚡सावंतवाडी ता.११-: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दरम्यान उद्या दुपारी तीन वाजता ते सावंतवाडी शहरात विविध सार्वजनिक तसेच पदाधिकाऱ्यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेणार आहेत.

Read More

गणेशोत्सवासाठी आलेले ७३९ भक्तांना किरकोळ आजार…

डाॅ.सई धुरी; जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत केली तपासणी१८ पथके होती कार्यरत सिंधुदुर्गनगरी ता २०जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत गणेशोत्सव कालावधीत १८ आरोग्य पथकामार्फत करण्यात आलेल्या तपासणीत सर्दी खोकला, ताप, अतिसार व किरकोळ आजाराचे असे मिळून ७३९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एका रुग्णाला संदर्भ सेवा देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी…

Read More

मोदी यांच्या ऐतिहासिक निर्णयाने महिलांना सर्वोच्च संसद भवनात नेतृत्व करण्याची संधी…

श्वेता कोरगावकर: मोदींनी आणलेले विधेयक हे मोठे क्रांतिकारक पाऊल… ⚡बांदा ता.२०-: भारतीय संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ या नावाने महिला आरक्षणाचे विधेयक मांडले. तसेच महिलांसाठी लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षणाच्या विधेयकाची घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांच्या या ऐतिहासिक निर्णयाने महिलांना देशाच्या व राज्याच्या सर्वोच्च संसद भवनात नेतृत्व करण्याची…

Read More

गाबीत फिशरमेन फेडरेशन च्या मालवण अध्यक्षपदी श्री विकी चोपडेकर यांची एकमताने निवड

⚡मालवण ता.२०-: गाबीत समाजाच्या सहकार, सामाजिक, आर्थिक समस्यांना सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गाबीत फिशरमेन फेडरेशन च्या मालवण अध्यक्षपदी श्री विकी चोपडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली गाबीत फिशरमेन फेडरेशन ची सभा हॉटेल श्री महाराज मालवण संपन्न झाली यावेळी माजी नगराध्यक्ष व गाबीत समाज वेंगुर्ला अध्यक्ष श्री दिलीप गिरप , देवबाग सरपंच श्री उल्हास तांडेल ,…

Read More

कणकवली तालुकास्तरीय विज्ञान नाटक स्पर्धेत कासार्डे विद्यालयाचे यश

⚡कणकवली ता.२०-: नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई आणि शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाटक वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे या प्रशालेत संपन्न झाल्या.या स्पर्धेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक मिळाला आहे.या यशस्वी विद्यार्थ्यामध्ये प्रत्युष पाताडे, वैदही पाताडे, सानिका खराटे, गौरेश शिंदे, भार्गवी खानविलकर, दीपक कानडे, अश्मेष लवेकर व रिया…

Read More

जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेत निता सावंत प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.२०-: शाळा व्यवस्थापन समितीमध्ये कार्य करत असताना महिलांना विचार व्यक्त करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, पुढे त्यांनी यातून सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय आणि विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवावा या उद्देशाने वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग व कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर-मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्यांसाठी जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. यात…

Read More
You cannot copy content of this page