⚡सावंतवाडी ता.१७-: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखस्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची अकरावी पुण्यतिथी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी जिल्हा समन्वयक श्री चंद्रकांत गावडे, उपजिल्हा प्रमुख श्री चंद्रकांत कासार, तालुका समन्वयक श्री मायकल डिसोजा, महिला तालुका संघटक सौ. भारती कासार, सौ. नम्रता झारापकर,कु.तनश्री झारापकर, शहर प्रमुख श्री शौलेश गवंडळकर,उपतालुका प्रमुख श्री राजू शेटकर, विभाग प्रमुख श्री नामदेव नाईक, फिलिप्स रॉडिक्स, विनोद ठाकूर, राजा वाडकर सुनिता राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरे यांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक चंद्रकांत गावडे यांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तालुका समन्वयक मायकल डिसूजा यांनी पुष्पहार अर्पण केला
