काॅलेटी पदाधिकामुळे मंत्री केसरकरांचा निवडणुकीत विजय …

राजन पोकळे ; शहरात फाडण्यात आलेले ही बाहेरची विकृती..

⚡सावंतवाडी ता.१७-: मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मोजके पदाधिकारी जरी असले तरी त्या पदाधिकाऱ्यांकडे कॉलिटी असल्यामुळे मंत्री दीपक केसरकर हे निवडून येतात ही सावंतवाडीची वस्तुस्थिती आहे असे मत माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी मांडले.

दरम्यान शहरात फाडण्यात आलेले बॅनर हे सावंतवाडीकरांची विकृती नसून ही बाहेरच्यांची विकृती आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत बाहेरच्या विकृतींना सावंतवाडीकर नक्कीच माघारी पाठवतील असं टोला देखील श्री.पोकळे यांनी मित्रपक्षासह विरोधकांना लगावला.

यावेळी तालुकाप्रमुख बबन राणे, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page