माऊली मित्र मंडळाच्यावतीने कणकवलीत बाळासाहेब ठाकरे यांना केले अभिवादन…

⚡कणकवली ता.१७-: कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे माऊली मित्र मंडळ व व्यापारी मित्र मंडळाचे राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि रिक्षा संघटनेचे संजय मालंडकर यांनी पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस स्मृतिदिनी केले अभिवादन केले.
यावेळी राजेंद्र पेडणेकर म्हणाले, आज आम्ही मंडळाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल असलेल्या आदरयुक्त भावनेतूनच, स्मृतिदिनी अभिवाचन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला.


यावेळी माऊली मित्र मंडळ आणि व्यापारी मित्र मंडळाचे सदस्य, जमिल कुरेशी, प्रसाद पाताडे, अविनाश गावडे, प्रसाद उगवेकर, सईद नाईक, सचिन कुवळेकर, अविनाश जैताळकर, दयानंद, मोडक, महेश वायंगणकर, महेश जाधव, विशाल रजपूत, हेमंत नाडकर्णी, निलेश निखार्गे, सह माऊली मित्र मंडळाचे आणि व्यापारी मित्र मंडळाचे, आणि अप्पासाहेब पटवर्धन चौकातील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 11वा स्मृतिदिनाचे औचित साधून अप्पासाहेब पटवर्धन येथिल कणकवली शहरातील उड्डाण पुलाखालील परिसराची साफसफाई माऊली मित्र मंडळ आणि व्यापारी मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे.या परिसरातील भाजीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले, आणि माऊली मित्र मंडळाचे व्यापारी मित्र मंडळाचे आभार मानले. नगरपंचायत व्यापारी मित्रमंडळामधील असलेल्या सर्व व्यापाऱ्यांच्या पत्नींना आणि बहिणींना दिपावलीनिमित्त भाऊबीज भेट दिली.

You cannot copy content of this page