विशाल परब यांची उपस्थिती:
पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या रणनितीबाबत मार्गदर्शन
सावंतवाडी ता.१७-: आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकरणीची बैठक नुकतीच संभाजीनगर येथे पार पडली. यावेळी 2024 महाविजय अभियाना संदर्भात चर्चा करण्यात आली.
ही बैठक रोहित चहलजी,गौरव गौतमजी, विक्रांत पाटील व राहुल लोणीकर यांनी उपस्थित युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी देखील या बैठकीला उपस्थिती लावली.

