पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान…
⚡वेंगुर्ला ता.११-: स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने नाट्य चळवळीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या जिल्ह्यातील पडद्यामागील कलाकारांचा सन्मान १२ जानेवारी रोजी होणार आहे.
⚡वेंगुर्ला ता.११-: स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने नाट्य चळवळीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या जिल्ह्यातील पडद्यामागील कलाकारांचा सन्मान १२ जानेवारी रोजी होणार आहे.
⚡वेंगुर्ला ता.११-: विचार व भावनांचा समतोल तर सकारात्मक वर्तन घडते. प्रौढत्वाच्या उंबरठ्यावर कोणत्या वाटेवर आपण जातोय या जाणीवेचे भान असणे आवश्यक आहे. कोणत्याही कार्यात स्वप्रेरणा, स्वऊर्जा महत्त्वाची ठरते. स्वतःला ओळखा, स्वतःला समजून घ्या असे आवाहन मिनाक्षी आळवणी यांनी केले.
⚡सावंतवाडी ता.११-: भारत संचार निगमच्या मनमानी सेवेने त्रस्त बांद्यातील नागरीक व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येत सावंतवाडीतील भारत संचार निगमच्या कार्यालयात जोरदार धडक दिली. यावेळी बांदा व परिसरातील ५० नागरिक उपस्थित होते.त्यांच्याकडून भारत संचार निगमचे सिंधुदुर्ग उप- महाप्रबंधक, श्री.आर.व्ही जानू यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. यावेळी बांदा मराठा समाज सचिव आनंद वसकर यांच्याकडून अधिकाऱ्यांना ढीसाळ…
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने मागणी.. ⚡कणकवली ता.११-: गेल्या ५ वर्षात कधीही कॅम्प आयोजित करण्यात आलेला नाही. जर सेवाज्येष्ठता सूची तयार नसेल तर निवडश्रेणीचा लाभ देणे शक्य नाही. लाभार्थींना वेळीच लाभ मंजूर करण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे कॅम्प आयोजित करुन लाभ देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. कणकवली महाराष्ट्र शासनाच्या…
⚡सिंधुदुर्गनगरी ता.११-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस पदी तुषार आरोसकर तर जिल्हा शिक्षक नेते पदी सुरेखा कदम यांची निवड करण्यात आली.शिक्षक समिती सिंधुदुर्गचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच संपन्न झाले.या अधिवेशनात संघटनेचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी विषय नियामक सभेत निवड करण्यात आलेली सन २०२४ ते २०२७ या कालावधी साठीची कार्यकारिणी…
राजन तेली ; जिमखाना मैदानावर उद्या सकाळी मान्यवरांकडून होणार शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.११-: भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सिंधू रत्न जॉब फेअर मध्ये तब्बल वीस हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत त्यामुळे या जॉब फेअर मध्ये निवड करण्यात आलेल्या तरुण तरुणींना कंपनीकडून तात्काळ ऑफर लेटर देण्यात येणार असून कुठल्याही प्रकारचा दिखावूपणा…
⚡कणकवली ता.११-:कणकवली तालुक्यातील बावशी श्री देव गांगेश्वर पावणादेवी ब्राह्मण देव दहीकाला जत्रोत्सव रविवार 14 जानेवारी 2024 रोजी होणार आहे तरी सर्व भाविकांनी या जत्रोस्तवाला उपस्थित राहावे
⚡कणकवली ता.११-: ग्राहक चळवळीला समर्पित होऊन ग्राहकांच्या समस्या,तक्रारी,प्रबोधन करणेत सक्रिय राहून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या कार्यकर्त्यास (साधकास) गौरविण्यात येते.याप्रमाणे कार्याची विशेष दखल घेऊन राज्य कार्यकारिणीने जिल्हा संघटक सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांची उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड केली आहे. वैभववाडी येथील आंबेडकर भवन येथील जिल्हास्तरीय ग्राहक दिन कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांचे शुभहस्ते जिल्हा…
बंटी पुरोहित: मुख्याधिकारी यांच्याकडे केले निवेदनद्वारे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी शहरात मुख्यद्वार असलेल्या गवळी तिठा व बस स्थानक परिसरात कोणत्याही स्वच्छतेची काळजी न करता उघडपणे मासे विक्रेत्या करणाऱ्यांवर कारवाई करून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. दरम्यान मासे विक्री करणाऱ्या…
मडुऱ्यात पर्यटकांना अपघात : रिक्षाचालक धावला मदतीला.. ⚡बांदा ता.११-: मडुऱ्यातून बांद्याच्या दिशेने जाणाऱ्या एका युरोपियन दाम्पत्याचा व पाच वर्षीय मुलीचा मडुरा येथे दुचाकी घसरून अपघात झाला. यात चालकाच्या डाव्या हाताला व पायाला दुखापत झाली. तर पत्नीच्या उजव्या पायाला मार बसला. सुदैवाने पाच वर्षीय त्यांच्या मुलीला कोणतीही इजा झाली नाही. मात्र त्या युरोपियन पर्यटकाने रस्त्याच्या कामकाजावर…