कणकवली पर्यटन महोत्सवात शोभयात्रेने आणली रंगत…

चित्ररथ ठरले लक्षवेधी; ढोल , ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा.. ⚡कणकवली ता.११-: ढोल ताशांचा गजर, भव्य चित्ररथ, विविध वेशभूषेतील कलाकार आणि कणकवली शहरवासीयांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कणकवली पर्यटन महोत्सवाची शोभायात्रा निघाली.कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी ११ जानेवारी रोजी सायंकाळी शहरातून ढोल ,ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. श्री पटकीदेवी मंदिराकडून बाजारपेठ मार्गे अप्पासाहेब पटवर्धन चौकातून येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पर्यटन…

Read More

फुल विक्रेत्या महिलांना आम. वैभव नाईक यांनी स्व:खर्चातून दिले स्टॉल…

⚡मालवण ता.११-:मालवण शहरातील मेढा येथील जय गणेश मंदिरासमोर फुल व पूजा साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्या महिलांना माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर व बंड्या सरमळकर यांच्या पुढाकारातून आम. वैभव नाईक यांनी स्व: खर्चातून चार स्टॉल उपलब्ध करून दिले. या स्टॉलचे लोकार्पण आम. नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या स्टॉलच्या सोयीबद्दल महिलांनी आम. वैभव नाईक यांचे आभार मानले….

Read More

शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे…

संजू परब:पाच दुग्ध उत्पादकांचा परब यांच्या हस्ते सन्मान… ⚡बांदा ता.११-: शेतीला जोड धंदा म्हणून आज शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे. तो करताना प्रामाणिक सचोटीने व आवडीने केल्यास चांगले यशस्वी होवू शकता यासाठी शेतकऱ्यांनी शेती पुरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य द्या असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चीदानंद उर्फ संजू परब यांनी इन्सुली येथे केले. इन्सुली…

Read More

धूम स्टाईल वाहन चालविणाऱ्या चालकांना कडक समज द्या…

उबाठा शिवसेनेच्या रियाज खान यांची पोलिसांकडे लेखी मागणी. बांदा/प्रतिनिधी-:बांदा शहरात गेल्या आठ दिवसात महाविद्यालयीन तसेच शाळकरी मुलांकडून धूम स्टाईल गाडी चालविण्यात येत असून यामुळे झालेल्या अपघातात नागरिकांना दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे नियमबाह्य वाहन चालवीणाऱ्या विद्यार्थ्यांना कडक शब्दात समज द्यावी अशी लेखी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी बांदा पोलिसांकडे केली…

Read More

काजू पीक विमा वाटपात ९ गावांवर अन्याय…

अन्याय दूर न केल्यास 26 जानेवारीला आंदोलन:शेतकरी कामगार संरक्षण विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांचा इशारा… सिंधुदुर्गनगरी ता ११सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री भागातील ९ गावे अद्यापही काजू पीक विमा नुकसान भरपाई रकमेपासून वंचित आहेत. त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. या मागणीसाठी आज शेतकरी कामगार संरक्षण विकास संघटना सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे…

Read More

वैद्यकीय महाविद्यालयाचा डॉ सुनिता रामानंद यांच्याकडील पदभार काढला…

जोशी यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा पदभार.. ओरोस ता.११-:सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वादांकीत ठरलेल्या अधिष्ठाता डॉ सुनिता रामानंद यांच्याकडील पदभार अखेर वैद्यकीय शिक्षण विभागाने काढून घेतला आह हा पदभार महाविद्यालयाचे शरीररचना शास्त्र प्राध्यापक डॉ मनोज जोशी यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे अधिष्ठाता विरुद्ध जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यात गेले काही महिने सुरू असलेल्या वादाला तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.

Read More

कुडाळ मधील मनसेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी सोडले प्राथमिक सदस्यत्व…

अंतर्गत नाराजी नाट्य अजून सुरूच सिंधुदुर्गनगरी ता ११-:नववर्षाच्या सुरुवातीलाच मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्यासह सावंतवाडी,दोडामार्ग व मालवण येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी राजीनामा नाट्यानंतर जिल्ह्यात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र जोर धरू लागले आहे. मनसे संघटनेत उभी फूट पडलेली दिसून येत आहे.पक्ष निरीक्षकांच्या पक्षातील अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून कुडाळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या…

Read More

मालवणात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न…

⚡मालवण ता.११-: मालवण देऊळवाडा येथील महापुरुष देवस्थान येथे तेली बांधवांच्या उपस्थितीत संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा विधिवत संपन्न झाला. यावेळी पुरोहीतांच्या उपस्थितीत दिनेश डिचवलकर यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आरती व प्रसाद वाटप करून भजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तेली समाजातील मान्यवर व समाज बांधव, महिला आदी बहुसंख्येने उपस्थित…

Read More

राहुल नार्वेकरांच्या घटनाबाह्य निकालातून लोकशाहीची पायमल्ली…

हरी खोबरेकर:मालवणात ठाकरे शिवसेनेकडून राहुल नार्वेकर यांचा निषेध.. ⚡मालवण ता.११-:मुर्दाबाद… मुर्दाबाद…राहुल नार्वेकर मुर्दाबाद, घटनेची पायमल्ली करणाऱ्या राहुल नार्वेकर यांचा निषेध असो… शिवसेना आमच्या सायबांची…नाही कोणाच्या बापाची !…हमारा नेता कैसा हो… उद्धव ठाकरे जैसा हो अशा घोषणा देत आज मालवणात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यानी दिलेल्या निकालावर संताप…

Read More

कातकरी समाजाला दिल्या निमंत्रक मंत्राक्षता…

⚡वेंगुर्ला ता.११-: अयोध्या येथील राम मंदिर प्रतिष्ठापनेला अवघे चार दिवस शिल्लक राहिले असताना सर्वत्र अयोध्या येथून आलेल्या निमंत्रक मंत्राक्षता घरोघरी पोहचविण्यासाठी लगबग वाढली आहे. कुणीही निमंत्रणापासून वंचित राहू नये यासाठी रामभक्त काळजी घेत आहेत. दरम्यान, वेंगुर्ला-कॅम्प परिसरात असलेल्या कातकरी समाजालाही या निमंत्रक मंत्राक्षता देण्यात आल्या. यावेळी श्रीरामच आपल्या समाजाचे दैवत असल्याचे नितीन पवार यांनी सांगितले….

Read More
You cannot copy content of this page