जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माऊली मित्र मंडळातर्फेमहिला पोलिसांचा सन्मान..

⚡कणकवली ता.०९-: “जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधून, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्र मंडळाचे वतीने, कणकवली पोलीस ठाण्यातील पीएसआय वृषाली बरगे यांना सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले,

कणकवली पोलीस निरीक्षक एस. एच. तडवी, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक हाडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, पो. हे. कॉ. पांढरे, किरण मेहत्रे , सुपल, कोलते, जाधव आदी उपस्थित होते,

यावेळी कणकवली पोलीस ठाण्यातील महिला पो. हवालदार स्मिता माने, पो. नाईक उज्वला मांजरेकर, पो. कॉन्स्टेबल प्रणाली जाधव, पो. कॉन्स्टेबल तृप्ती कुळये,महिला होमगार्ड जयश्री कट्टीमणी आदी उपस्थित होत्या.

सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर म्हणाले, आज जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने आम्ही माऊली मित्र मंडळाच्यावतीने हा नाही शक्तीचा सन्मान सोहळा आयोजित केला, ज्याप्रमाणे पुरुष पोलीस कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत असतात त्याप्रमाणे आमच्या महिला पोलीस चौवीस तास कार्यरत असतात, आणि म्हणून च आम्ही आज महिला पोलीस निरीक्षक वृषाली बरगे यांना सन्मानित केले.
संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर म्हणाले ,नारी शक्तीचा सन्मान करणे हे आमचेच नव्हे तर समस्त पुरुष वर्गाने नारी हि आदिशक्तीचेच रूप आहे, असे मानून तिचे रक्षण करणे हे आपले कर्तव्यच आहे,
यावेळी अविनाश गावडे भगवान कासले ,प्रभाकर कदम, सईद नाईक, प्रसाद पाताडे ,प्रसाद उगवेकर, लक्ष्मण महाडिक, बाबुराव घाडीगावकर ,हेमंत नाडकर्णी, विशाल रजपूत आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page