⚡मालवण ता.०९-: चिंदर ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र शासन, कृषी विभाग मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत श्रीमती रेखा मनोहर पिळणकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर अंजली संतोष गोसावी यांनी द्वितीय आणि नीलिमा अरविंद घाडी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला
चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, सरपंच नम्रता महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, माजी सभापती हिमाली अमरे , ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी घाडी, शशिकांत नाटेकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, प्रफुल्ल हडकर, दिगंबर जाधव, विलास हडपी, समिर अपराज, सिद्धेश नाटेकर, रणजित दत्तदास, साधना पाताडे, रोहिणी केळसकर, डी. डी. गावडे आचरा मंडल अधिकारी कृषी, एग्रीकार्डचे संतोष गावडे, पवण सुगडे, अस्विन कुरकुटे, विद्या कुबल, मिलिंद कांबळे, आनंद धुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. के. सावंत यांनी केले
यावेळी तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, उपसरपंच दिपक सुर्वे, माजी सभापती हिमाली अमरे, कृषी अधिकारी शिंदे यांनी यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
यावेळी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत प्रियांका धोंडू वराडकर, स्वाती सुधीर सुर्वे, सुप्रिया सुरेंद्र पडवळ, सोनल सुनिल कदम, जान्हवी जनार्दन घाडी, हिमाली सीताराम अमरे, आकांक्षा संदिप गावडे, चिंन्मयी चंद्रशेखर पाताडे यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण स्नेहल जिकमडे व अमृता भोगले यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. डी गावडे तर आभार ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांनी मानले.
