विशाल परब:मोरगांव चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन..
⚡ दोडामार्ग ता.०९-:
खेळाडूंसाठी क्रिकेट हा केवळ खेळ नसून त्यांच्या सामाजिक, मानसिक आणि आरोग्य यांच्या योगदानाचे प्रतिक असतो. असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे केले.दरम्यान खेळाच्या माध्यमातून व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही स्वास्थ्य लाभते तो म्हणजे क्रिकेट. असे हे श्री परब यावेळी बोलताना म्हाणाले.
या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंशी संवाद साधत त्यांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले.
यावेळी मोरगांव येथे आयोजित केलेल्या मोरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी – 2024 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री परब यांनी स्पर्धकांना पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा देत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.
