⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी तालुक्यातील एका विद्यालयत शिकणाऱ्या तब्बल शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे.त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपजिल्हा रुग्णालया सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले आहेत.सध्या सर्वांचे प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत असे मेडिकल ऑफिसर वर्षा शिरोडकर यांनी सांगितले. दरम्यान यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनाय राऊत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी रुग्णालयात भेट घेऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच योग्य ती खबरदारी घेण्याचे सूचना देखील पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिली.
विषबाधा झालेल्या मुलांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत ,यांनी केली विचारपूस…
