ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनतर्फे कुडाळ पोलिस स्टेशनसह कातकरी वस्तीवर महिला दिन साजरा…

⚡कुडाळ ता.०९-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या जिल्हा निरीक्षक मानसी परब यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ तालुका अध्यक्ष संजना संजय सावंत, कार्याध्यक्षा दीक्षा दिनेश सावंत, सुधा जगताप, गौतमी सावंत यांनी कुडाळ पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांच्या सहित अन्य महिला पोलीस कर्मचारी वर्गाला पुष्पगुच्छ देऊन महिला दिन साजरा केला.

यावेळी
वेंगुर्ले तालुक्यातील रेडी गावच्या सुकन्या शिरोडास्थित
मानसी परब यांनी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सामाजिक कार्याची माहिती देत पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली. यावेळी पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी सुद्धा सर्वांचे आभार मानले.
तसेच ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कुडाळ- तुपटवाडी येथील कातकरी वस्तीवर जाऊन या समाजातील महिलांना तसेच लहान मुलांना खाऊ वाटप केला.
यावेळी जिल्हा निरीक्षक मानसी परब यांनी कातकरी महिला वर्गाला आपले प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही तत्पर राहू असे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page